आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांभोवती रांगोळी अन् फुले, पीपल्स हेल्पलाइन जनसंसदेचे आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसदेच्या वतीने दिल्ली दरवाजा येथे खड्डा महोत्सव घेण्यात आला. खड्ड्यांभोवती रांगोळी रेखाटून फुलांनी ते सजवण्यात आले. प्रशासनाच्या निषेधार्थ बोंबा मारण्यात आल्या. पैशांनी मते विकत घेणारे लोकप्रतिनिधी विकाऊ मतदारांचा निषेध करण्यात आला.
कॉम्रेड बाबा आरगडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी अॅड. कारभारी गवळी, सुधीर टोकेकर, जालिंदर बोरुडे, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, चंद्रकांत चौगुले, अंबिका नागुल, गया देशमाने, बेगम मुजावर, मीना चोथे आदी उपस्थित होते.

आरगडे म्हणाले, पावसाने रस्ते वाहून गेले असून निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. मनपा अधिकारी पदाधिकारी टक्केवारीत गुंतलेले असताना अंदाजपत्रकातील ७० टक्के निधी खाल्ला जातो. या कारभाराने नगरकरांना निकृष्ट रस्ते मिळाले. जागरूक नागरिकांनी आवाज उठवून दाद मागण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अॅड. गवळी म्हणाले, जातीची राजकारण मतांसाठी पैसे घेऊन काही नागरिकांनी मतदान केल्याने शहराची दुरवस्था झाली आहे. नगरसेवक ठेकेदारांचे टक्केवारीचे व्यवहार सर्वश्रूत अाहेत. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना खड्ड्यांच्या रुपाने त्रास भोगावा लागत आहे. महापालिका खड्डे बुजवण्याऐवजी नागरिकांच्या जखमेवर अजून मीठ चोळत आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरुन पावसाने चिखल होऊन अपघातांचे प्रमाण वाढलेे. डांबर खडी टाकून दर्जेदार पध्दतीने रस्ते पॅचिंग करण्याची मागणी त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...