आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khakidasababa Math, Latest News In Divya Marathi

विश्वस्तांविरुद्ध खोटा गुन्हा रद्द करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- खाकीदासबाबा मठातील वादासंदर्भात पुजारी विजय मिर्शा यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी मठाच्या विश्वस्तांविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, फिर्यादी मिर्शा यांच्याविरुद्ध कारवाई करावी, तसेच विश्वस्तांना मिर्शा व त्यांच्या कुटुंबीयांपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी मठाच्या विश्वस्तांनी निवासी उपजिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
विश्वस्तांनी तसे लेखी निवेदन शनिवारी अधिकार्‍यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, शहरात खाकीदासबाबा नावाचे संत होते. त्यांनी स्व. रामप्रताप काबरा यांच्यावर मठाची व मंदिराची व्यवस्था सोपवली होती. नंतर त्यांचे पुतणे स्व. चुनीलाल काबरा यांनी मठ व मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी माहेश्वरी समाज बांधवांचा ट्रस्ट स्थापन करून कारभार सुरू केला. मंदिराची पूजा-अर्चा विजय मिर्शा यांच्या आजोबांनी पाहिली. त्यांना पगारही मिळत होता. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काम सोडून राजस्थानातील मूळ गावी निघून गेले.
सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी विजय मिर्शा यांनी पुजारी म्हणून काम द्यावे, अशी विनंती केल्यामुळे ट्रस्टने त्यांना पगार ठरवून पुजारी म्हणून नोकरीला घेतले. नंतर मिर्शा यांनी माहेश्वरी समाजातील लोकांचा विश्वास संपादन केला व ट्रस्ट परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागील पश्चिमेकडील दोन खोल्या वापरण्याची परवानगी मागितली. ट्रस्टने मिर्शा यांना दोन खोल्या दिल्या. परंतु, मिर्शा खोल्यांचा वापर ट्रस्टच्या हिताविरुद्ध करू लागल्यामुळे ट्रस्टींनी मिर्शांकडे खुलासा मागवला. दरम्यानच्या काळात ट्रस्टने मिर्शांना 9 ऑक्टोबर 2012 ला नोटीस देऊन नोकरीतून कार्यमुक्त केले व त्यांच्या ताब्यातील दोन खोल्यांचा ताबा परत मागितला. मिर्शांनी खोल्यांचा ताबा न दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.न्यायालयाने मिर्शा व कुटुंबीयांनी मंदिरातील पूजेत हस्तक्षेप करू नये, मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहन लावू नये, लॉन, शॉपिंग कॉम्प्लेक्ससह इतर मिळकतीत हस्‍तक्षेप करू नये, ट्रस्टच्या वहिवाटीमध्ये अडथळा करू नये, असा मनाई हुकूम दिला.
मिर्शा यांना दोन खोल्यांचा वापर करण्यासाठी दक्षिण बाजूने स्वतंत्र दरवाजा असूनही त्यांनी तो बंद केला. खोलीतून हॉलमध्ये जाणार्‍या अंतर्गत दरवाजातून प्रवेश केला व स्वत:ला कोंडून घेतल्याचा बनाव रचला.
पोलिसांना बोलवून खोटी माहिती देत गुन्हा दाखल केला. पण, मिर्शा यांनीच न्यायालयाच्या मनाई हुकूमाचा अवमान केला असून हॉलमध्ये बेकायदा प्रवेश केला. मिर्शा ट्रस्टची मिळकत हडप करण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करून मिर्शा यांच्यावर कारवाई करावी, असे विश्वस्तांनी म्हटले आहे. त्यामुळे मंगळवारी दाखल झालेल्या गुन्ह्याची शहानिशा करून योग्य कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी विश्वस्तांना दिली. यावेळी मोहनलाल मानधना, र्शीगोपाल धूत, मधुसूदन सारडा, दीपक काबरा, शिवदास डागा, किसन बंग, अँड. सुनील मुंदडा, मनोज मुंदडा, चंद्रकांत काबरा, रमेश कासवा, सुधीर पगारिया, सौरभ बोरा, संजय बोरा व इतर उपस्थित होते.