आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी येथील अपहृत तरुणाची सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिर्डीतून अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची 24 तासाच्या आत सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले. पाथर्डी येथील धनगर वस्तीतून या युवकाची सुटका करून सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सोनू मानसिंग चितोडिया या युवकाचे गुरुवारी (9 मे) अपहरण करण्यात आले. यासंदर्भात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अपहरणासाठी वापरलेल्या चारचाकी वाहनाचा क्रमांक पोलिसांना मिळाला. पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्चयाकडून हा क्रमांक स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोभे यांच्याकडे देऊन तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार एलसीबीची पथके या गाडीच्या मागावर होते. 24 तासाच्या आत या टोळीचा पर्दाफाश करण्यात एलसीबीला यश आले. पाथर्डी येथील धनगर वस्ती येथे राहणार्‍या प्रविण विजय दिनकर यांच्या घरी डांबून ठेवलेल्या अपह्रत युवकाची सुटका करण्यात आली.

प्रविणकडून मिळालेल्या माहितीनूसार रविंद्र मच्छिंद्र गोसावी (30, अकोला, पाथर्डी), अंबादास कोंडिबा दराडे (32, पिंपळगाव टप्पा), पांडुरंग गोविंद भांडकर (25, नाथनगर, पाथर्डी), अरुण सिताराम गिरी (25, खरपुडी, ता. जि. जालना), भुजंग संपत गज्रे (32, अकोला, पाथर्डी), राजू सज्रेराव पवार (25, वसंतदादा शाळेजवळ, पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत. अपहरणासाठी वापरलेली सफारी गाडी (एमएच 16 एबी 201) जप्त करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी सातही आरोपींना शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.