आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिर विद्यालयाच्या वसतिगृहातून विद्यार्थ्याचे अपहरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जानकीबाईआपटे मूकबधिर विद्यालयाच्या वसतिगृहातून १४ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. विकी बाळू साळवे (देसवडे, ता. नेवासे) असे अपहृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. टिळक रोडवरील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयाच्या वसतिगृहात राहणारा विकी रविवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास बाहेर गेला असता अनोळखी व्यक्तींनी त्याला पळवून नेले. विकी वसतिगृहात नसल्याचे लक्षात आल्यानंतर वसतिगृह अधीक्षकांनी त्याचा शोध घेतला. दोन-तीन दिवस उलटूनही तो सापडला नाही. वसतिगृहाचे अधीक्षक रामचंद्र गोडळकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. तपास उपनिरीक्षक व्ही. एल. सणस करीत आहेत.