आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kinetic Company Administration And Worker Contro

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वटसावित्रीच्या दिवशी कामगारांच्या सौभाग्यवतींनी धारण केला रुद्रावतार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कायनेटिक कंपनीत काम करणार्‍या आपल्या पतीदेवांची पिळवणूक करणार्‍या व्यवस्थापकाला कामगारांच्या सौभाग्यवतींनी सोमवारी वटसावित्रीच्या दिवशी रुद्रावतार दाखवत चांगलीच समज दिली.

कायनेटिक कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत गुळवे कामगारांची गेल्या अनेक दिवसांपासून पिळवणूक करतात, अशी तक्रार आहे. करारानुसार काम होत नाही असे सांगून दमबाजी करणे, कामगारांचा पगार कापणे यासारखे प्रकार करून कामगारांची पिळवणूक केली जाते. ही माहिती कामगारांच्या सौभाग्यवतींना समजल्यावर त्यांनी सोमवारी सायंकाळी गुळवे यांच्या घरावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये आमदार अनिल राठोड, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह सेनेच्या महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या. गुळवे यांच्या बोरूडे मळ्यातील घरावर मोर्चा आल्यावर परिसरातील नागरिकही मोठय़ा संख्येने तेथे जमा झाले. यावेळी आमदार राठोड यांच्यासह कामगारांच्या सौभाग्यवतींनी गुळवे यांना पिळवणूकीबाबत जाब विचारला. यापुढे कामगारांची पिळवणूक केल्यास महिलांच्या रुद्रावतारास तोंड द्यावे लागेल, असा इशाराही दिला. गुळवे यांच्या पत्नीलाही समज देत पतीदेवांना समजावून सांगण्यास सांगण्यात आले. महिलांच्या या रुद्रावतारामुळे निरुत्तर झालेल्या गुळवे यांनी पिळवणूक न करण्याचे आश्वासन दिले.