आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kirtankar Badrinath Maharaj Comment On Education

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षण व साहित्यातून होते सकस समाजाची निर्मिती; कीर्तनकार बद्रिनाथ महाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- समाजातील अज्ञान व दारिद्रय़ घालवणे म्हणजे समाजसेवा आहे. हेच कार्य प्राचार्य डॉ. भि. ना. दहातोंडे आपल्या ज्ञानदानाच्या माध्यमातून गेली अनेक दशके करीत आहेत. शिक्षण व साहित्यातून सकस समाजाची निर्मिती होते, असे प्रतिपादन कीर्तनकार बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी केले.


पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथील सद्गुरु वुमेन्स कॉलेज ऑफ बीसीएच्या वतीने डॉ. दहातोंडे यांच्या एकाहत्तरीनिमित्त अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बद्रिनाथ महाराज बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव परशुराम घोरपडे, सत्यभामा तनपुरे, मेजर टी. एन. दहातोंडे, रावसाहेब मोरे, अप्पासाहेब सुरवसे, सुधीर लंके, प्रा. गणेश भगत, अरुण आहेर, वसंत दहे, प्रा. मोहनराव गुंजाळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. विठ्ठल आव्हाड यांनी केले.

प्राचार्य डॉ. दहातोंडे व त्यांची पत्नी शशिकला यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी पुस्तके देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी बद्रिनाथ महाराज म्हणाले, प्राचार्य दहातोंडे यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. महर्षी वि. रा. शिंदे यांच्या विचारांच्या प्रसारासाठी ते सतत धडपडत राहिले. हे करताना हारतुर्‍यांपासून ते दूर राहिले. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करण्याचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा. अशी माणसे आज समाजात दुर्मिळ झाली आहेत.

सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. दहातोंडे म्हणाले, या गौरव सोहळ्याने जगण्याला एकप्रकारे बळ मिळाले आहे. विद्यार्थिनींच्या रूपाने माझ्या लेकींनी केलेला हा सत्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लतेश पावसे यांनी केले. आभार प्रा. प्रमोद चहाल यांनी मानले.