आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद देणारा प्रेमाचा "गोड गोड पापा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आईचे प्रेम, वडिलांची काळजी आणि प्रेम दर्शवणारा ओठांचा स्पर्श. प्रेम आणि आपुलकी यांची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन वीकमधील सातवा दिवस किस डे. या दिवशी मुले आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना ओठांचा कोमल स्पर्श करून प्रेमाची आठवण करून देतात.
गालावर कपाळावर केलेला हा स्पर्श प्रेमामध्ये गिफ्ट दिल्यासारखेच आहे. आपल्यासोबत चालणारे कोणी तरी असल्याचे सांगणारे प्रतीक आहे. हा स्पर्श कधी भावनांना व्याकूळ करतो, तर कधी दु:खामध्ये सावरतो. व्हॅलेंटाइन वीकमध्ये या दिवसाचे खास महत्त्व आहे. शहरात यानिमित्ताने काही खास भेटवस्तू आलेल्या आहेत. यामध्ये किसिंग फिश आणि किसिंग टेडीला चांगली मागणी आहे. यांचीकिंमत १०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. मॅरिड कपल्स एकमेकांना रॅबिट आणि किसिंग टेडी देत आहेत.
मन भरून येते-
शहरातील बबिता गुप्ता सांगतात, मुलांसोबत प्रेमाचा क्षण हा नेहमीच अविस्मरणीय असतो; परंतु कामामुळे मुलांना जास्त वेळ देता येत नाही, मुलांकडे नकळत दुर्लक्ष होते. मुलगा दिवित मुलगी जिनिशा जेव्हा गोड पापा देते तेव्हा मन भरून येते आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात.
माझ्यासाठी औषध
निवृत्त प्राध्यापक एल. एम. कांदे सांगतात, नातू ध्रुव चार वर्षांचा आहे. ध्रुवची अाणि माझी चांगली गट्टी आहे. ध्रुव जेव्हा लाडाने गोड पापा देतो तेव्हा सर्व थकवा दूर होतो. तो माझ्यासाठी एक औषध आहे.
किसिंग फिश, टेडी
किस डेसाठी तरुणाई युनिक प्रकारचे गिफ्ट घेत आहे, ज्यामध्ये किसिंग फिश आणि किसिंग टेडी यांना चांगली मागणी आहे. कपल्स एकमेकांना किस डेला आकर्षक रंगाचे फिश देत आहेत, यासाठी खास अॅक्वेरिअमही बनवण्यात येत आहेत.