आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणातील पाणी गोदावरीत, सर्वेक्षणासाठी 1 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावरील कोकणात जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्यासाठी स्वतंत्र विभागाद्वारे 1 वर्षात सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी रुपये त्वरित मंजूर करण्यात येणार आहेत, अशी घोषणा जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केली.
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शनिवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख अध्यक्षस्थानी होते. आमदार चंद्रशेखर घुले, आमदार शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, जिल्हाधक्ष घनश्याम शेलार उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, कोकणातील नागरिकांना या भागाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी गोदावरी खोर्‍यात तूट भरून काढण्यासाठी समुद्राला जाणारे पाणी वळवलेच पाहिजे. मुळा धरणाची उंची वाढवण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात निधी मागवण्यात येईल.
यापुढे निळवंड्यातून पाणी सोडल्यावर प्रत्येकवेळी टेल टू हेड बंधारे भरण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ज्या गावतलावात पाणी साठल्याबद्दल
पाणीपट्टी आकारली आहे, ती पाणीपट्टी माफ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येईल, असेही तटकरे यांनी सांगितले. या वेळी पक्ष कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.