आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolase Patil Speak At Rally Issue At Nagar, Divya Marathi

‘एक नोट, एक वोट’च्या नावाखाली फ्रॉड : कोळसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ‘एक नोट, एक वोट’च्या नावाखाली किंवा जेवणासह चहा पाटर्य़ांतून निवडणुकीत पैसे गोळा करणे म्हणजे बिग फ्रॉड आहे, अशी टीका करून कोणाचाही एक पैसा न घेता निवडणूक लढवणार आहे, असे नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकशासन पक्षाचे उपाध्यक्ष साईनाथ पाटील, शिवराज्य पक्षाचे उपाध्यक्ष संजीव भोर, समाजसेवक राजेंद्र निंबाळकर या वेळी उपस्थित होते. कोळसे म्हणाले, जिल्ह्यातील साखरसम्राटांच्या उमेदवारांना मतदान यंत्रातून गरीब जनता ताकद दाखवून देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करताना जमीन व सोन्यात गुंतवणूक केली होती. त्यावेळी पंधरा लाख रुपयांत घेतलेल्या फ्लॅटची किंमत आता तीस कोटी झाली. चाळीस वर्षांपासून नियमित आयकर रिटर्न भरले आहेत. गरिबांच्या विकासासाठी केलेल्या आंदोलनासाठी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत. काँग्रेस व भाजपने आतापर्यंत देशातील गरिबांना जीवनाचा अधिकार नाकारला आहे, तर खोटे बोलण्यात आप (आम आदमी पक्ष) हा काँग्रेस व भाजपचाही बाप असल्याची, टीका कोळसे यांनी या वेळी केली.