आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोपर्डी’तील आरोपींच्या मानसशास्त्रीय चाचण्या पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोपर्डी(ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपींच्या ब्रेनमॅपिंग, पॉलिग्राफ नार्को, या मानसशास्त्रीय चाचण्या घेण्याचे काम पूर्ण झाले आहे.
प्रयोगशाळेकडून या चाचण्यांचा अहवाल १५ दिवसांनी मिळणार असून त्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाईल. ऑगस्टला आरोपींच्या संमतीनंतर न्यायालयाने या चाचण्या घेण्याची परवानगी पोलिसांना दिली होती. ऑगस्ट असे दोन दिवस मुंबईतील सीबीआय लॅबमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. गुन्ह्यात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा लागावी, यासाठी या चाचण्या घेतल्या आहेत. मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांच्या मानसशास्त्रीय चाचण्या घेण्यात आल्या. आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी मुंबईमध्ये नेले होते. त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...