आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेपर्डी घटनेच्या दिवशी अाराेपीच ‘ते’ फाेन वापरत होते’, पोलिसांची न्‍यायालयात माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - काेपर्डीतील अत्याचार प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल फाेन ते अाराेपी घटनेच्या दिवशी वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी, पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी मंगळवारी न्यायालयात न्यायालयात दिली.  आता बुधवारी या खटल्यात कर्जतच्या एका पोलिसाची साक्ष हाेणार आहे.  
 
कोपर्डी खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे.  सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी  पाटोळे यांची सरतपासणी घेतली. तपासात आरोपींचे मोबाइल नंबर घेऊन त्यांच्या संभाषणाचे तपशील मिळवण्याची प्रक्रिया केल्याचे पाटाेळे यांनी सांगितले. घटनास्थळाचा नकाशा मिळवण्यासाठी भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार केला. आरोपीच्या मोटारसायकलीची कागदपत्रे, तिच्या खरेदीच्या व्यवहाराचे तपशील मिळवले. पोलिस निरीक्षक गवारेंना आरोपींच्या घरझडतीच्या सूचना केल्या. त्यात मिळालेले महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले.    
 
आरोपींच्या राहत्या घराचे पुरावे गोळा करण्यासाठी ग्रामसेवकासोबत पत्रव्यवहार केला. सर्व पुरावे गोळा करून तपास पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबरला गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे पाटोळे यांनी नमूद केले. तसेच न्यायालयात असलेल्या आरोपींनाही त्यांनी ओळखले. आरोपींच्या वतीने अॅड. योहान मकासरे, अॅड. बाळासाहेब खोपडे व प्रकाश आहेर यांनी त्यांची एकूण अडीच तास उलटतपासणी घेतली.
 
तपासाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच आरोपी अटक झालेले होते. त्यांचे मोबाइलही जप्त केलेले होते. आपल्याकडे तपास आल्यानंतर आपण त्यांच्या संभाषणाचे तपशील तपासले, असे पाटोळे म्हणाले, तर तपशिलातून काय निष्पन्न झाले अशी विचारणा अॅड. प्रकाश आहेर यांनी केली. त्यावर आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल घटना घडली त्या दिवशी तेच वापरत होते. त्यांचे एकमेकांशी संभाषणही झालेले होते, अशी माहिती पाेलिस निरीक्षक पाटोळे यांनी दिली.  

वकिलांना तंबी  
उलट तपासणी घेताना अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी  पाटोळे यांना काही प्रश्न दरडावून विचारले. त्यावर अॅड. निकम यांनी आक्षेप घेतला. साक्षीदार हे पोलिस निरीक्षक आहेत. त्यांना असभ्य प्रकारे प्रश्न विचारून त्यांचा अपमान करू नये, असे निकम यांनी सुनावले. अॅड. खोपडे यांना सूचना देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने खोपडे यांना व्यवस्थित प्रकारे प्रश्न विचारण्याची सूचना केली.
बातम्या आणखी आहेत...