आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबावामुळे नव्हे, तपासामध्ये नाव अाल्याने भैलुमेला अटक; कोपर्डी खटल्यास पाेलिसांची साक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काेपर्डीखून खटल्यात तपासात नाव निष्पन्न झाल्यामुळेच तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमेला अटक केली. कर्जत अथवा राज्यात मोर्चे निघाले म्हणून कोणाला अटक केली नाही, अशी साक्ष पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी साेमवारी न्यायालयात दिली.
 
उलटतपासणीत भैलुमेच्या वकिलांच्या आक्षेपांचा त्यांनी इन्कार केला. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या खटल्यात त्यांची उलटतपासणी पूर्ण झाली. याशिवाय मोबाइल कंपन्यांच्या दोन अधिकाऱ्यांच्या साक्षीही पूर्ण झाल्या.
 
सकाळी साडेअकराला कामकाज सुरू झाले. एअरटेल आयडिया कंपनीच्या दोन नोडल अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. आरोपींच्या नावावर असलेल्या मोबाइल कॉल्सचे तपशील त्यांनी नमूद केले. अत्याचाराची घटना घडली त्या दोन-तीन दिवसांत तिन्ही आरोपींचे मोबाइल त्याच परिसरात असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोघांची सरतपासणी घेतली.
 
आरोपींच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे, अॅड. प्रकाश आहेर यांनी उलटतपासणी घेतली. नाेडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या सीडीआर (मोबाइल संभाषणाचा तपशील) प्रमाणपत्रांमध्ये ज्या संगणकातून प्रमाणपत्र काढले त्याचा सिमकार्डचा नंबर नमूद नसल्याचे आक्षेप त्यांनी घेतले. आरोपी जितेंद्र शिंदेच्या वतीने उलटतपासणी घेताना अॅड. सागर तडके यांनीही तांत्रिक मुद्द्यांवर आक्षेप घेतले. सिमकार्ड कोणत्या आकाराचे होते याची माहिती प्रमाणपत्रात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
 
वकिलांना पुन्हा दंड
गेल्यावेळी अॅड. बाळासाहेब खोपडे सुनावणीला गैरहजर होते. त्यामुळे आरोपी संतोष भवाळतर्फे अॅड. योहान मकासरे यांनी काम पाहावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. अॅड. खोपडे यांनी त्यावर अर्ज करून गवारे यांची उलटतपासणी घेण्याची परवानगी मागितली. अॅड. निकम यांनी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे खोपडे यांना परवानगी मिळाली. मात्र, न्यायालयाने त्यांना हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. खोपडेंनी दंड भरण्यास नकार दिल्यामुळे ही रक्कम महसूलमार्फत वसूल करावी लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...