आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी अत्याचार खटला; सुनावणी १८ अाॅक्टाेबरपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याप्रकरणी खटल्याची सुनावणी १८ ऑक्टोबरपासून येथील सत्र न्यायालयात सुरू होत आहे. या प्रकरणी तिघांवर अाराेप अाहेत. पहिल्या दिवशी आरोपींविरुद्ध दोषनिश्चितीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
१३ जुलैला नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे तिघांनी शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केला. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे, त्याचे साथीदार नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांना अटक केली. ७ ऑक्टोबरला पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात तिघा आरोपींविरुद्ध सुमारे ३०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे तब्बल ७० साक्षीदार तपासले जाणार आहेत. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार सत्र न्यायालयात १८ अॉक्टोबरपासून या खटल्याची सुनावणी सुरु होत आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या खटल्यात सरकार पक्षाची बाजू पाहणार आहेत. कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...