आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी प्रकरणातील तीन आरोपींवर दोष निश्चित, २० डिसेंबरपासून खटल्याची नियमित सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींवर बुधवारी दाेषनिश्चिती करण्यात आली. २० डिसेंबरपासून या खटल्याची नियमित सुनावणी होईल. तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमेच्या घरचे सील काढण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फेटाळला. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी पोलिस व साक्षीदारांवर आरोप करत अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवणार असल्याचे सांगितले.
आरोपी भैलुमे याचे वकील प्रकाश आहेर यांनी भैलुमेच्या घराचे सील काढण्याबाबत केलेल्या अर्जावरील अतिरिक्त मुद्द्यांवर युक्तिवाद केला. हा अर्ज दाखल केला त्याच दिवशी कर्जतच्या पोलिस निरीक्षकांनी आरोपीच्या भावाला फोन करून बोलावून धमकावले, असे ते म्हणाले. पोलिसांनी केलेल्या भैलुमेच्या घराचा पंचनाम्यात संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत. मग त्याच्या घराला कुलूप कशासाठी व कोणत्या अधिकाराने लावले, असा सवाल त्यांनी केला.

हे ठेवले आरोप
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे, त्याचे साथीदार संतोष भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे यांच्याविरुद्ध संगनमताने कट रचणे, बलात्कार करणे, कट रचून विनयभंग करणे, लैंिगक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाद्वारे आरोप निश्चित करण्यात आले. सरकार पक्षाने खटल्यातील साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली.
बातम्या आणखी आहेत...