आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डी बलात्कार प्रकरणतील तीनही आरोपींना आज होणार शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून खटल्यात दाेषी ठरलेल्या तीनही अाराेपींना बुधवारी नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात शिक्षा सुनावली जाईल. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पीडित मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोपर्डी खटल्यात १८ नोव्हेंबरला आरोपींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर दोन दिवस शिक्षेबाबत सरकारी व बचाव पक्षांनी युक्तिवाद केला हाेता.
बातम्या आणखी आहेत...