आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरठण खंडोबा यात्रेत पाच लाख भाविक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्यातील लाखो भाविकांचे र्शध्दास्थान असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा यात्रेची सांगता मानाच्या काठय़ांच्या शाही मिरवणुकीने मंगळवारी झाली. तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी गर्दीचा महापूर लोटला होता. सुमारे पाच लाख भाविकांनी शेवटच्या दिवशी दर्शन घेतले.

यात्रेस रविवारपासून प्रारंभ झाला. यात्रेच्या तिसर्‍या दिवशी मानाच्या काठय़ांची शाही मिरवणूक आकर्षण ठरली. या मिरवणुकीत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बेल्हे व ब्राrाणवाडा येथील मानाच्या काठय़ांची तहसीलदार जयसिंग वळवी, पोलिस निरीक्षक सुनील शिवरकर यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. बेल्हे येथील मानाच्या काठीने कळसाचे, तर ब्राrाणवाडा येथील मानाच्या काठीने देवदर्शन घेतले. सकाळी सात वाजता खंडोबाची आरती व महापूजा करण्यात आली. खंडोबाच्या चांदीच्या पालखीचेही यावेळी प्रस्थान झाले. भाविकांनी मुक्त हस्ते उधळलेल्या भंडार खोबर्‍यामुळे मंदिर परिसर पिवळाधमक झाला होता. मानाच्या काठय़ांबरोबरच अळकुटी, बेल्हे, साकुरी, तांदळी वडगाव, माळवाडी, राजापूर, सावरगाव घुले, कासारे व कळस या गावातील पालख्याही मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.