आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा गोंधळ; कोतकर पिता-पुत्र निर्दोष मुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहातील बाक व खुर्च्यांचे नुकसान करून महिला नगरसेविकांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपातून भानुदास कोतकर व संदीप कोतकर पिता-पुत्रासह नऊजणांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एम. निराळे यांनी हा निकाल दिला.

20 मे 2004 रोजी तत्कालीन महापौर भगवान फुलसौंदर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू असताना उबेद शेख, संजय झिंजे, नंदकुमार पवार आदींनी काळे झेंडे घेऊन घोषणा दिल्या. भानुदास कोतकर, संदीप कोतकर, मुदस्सर शेख, नामदेव पवार आदींनी बाक, खुर्च्या व माइक आपटून नुकसान केले. नगरसेविका रोहिणी शेंडगे व अर्चना बिज्जा यांना धक्काबुक्की केली.
सहायक पोलिस निरीक्षक बोंदर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले.
सरकारतर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले. फुलसौंदर, नंदीक चत्तर, बंडू इवळे, दीपक सूळ, महादेव पठारे यांच्या साक्षी तपासण्यात आल्या. आरोपींच्या विरोधात सबळ पुरावा सरकार पक्षाला सादर करता आला नाही. त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. शिवाजी कराळे, अ‍ॅड. विजय गुंदेचा, अ‍ॅड. परिमल फळे, अ‍ॅड. हर्षद कटारिया, अ‍ॅड. राकेश पाटील आदींनी काम पाहिले.