आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोतकर पुत्रांचे जामीन अर्ज फेटाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खड्ड्यांचे शहर - लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले भानुदास कोतकर पुत्रांचे जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक एस. आर. सय्यद यांनी फेटाळले. लांडे याचा १९ मे २००८ रोजी अकस्मात मृत्यू झाल्याची कोतवाली पोलिसांनी नोंद केली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शंकरराव राऊत यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खासगी फिर्यादीवरून न्यायाधीश अजय भटेवरा यांनी १० सप्टेंबर २००९ रोजी खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेशात नमूद होते. त्यानुसार तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश, सहायक पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. नगर नाशिकमध्ये हा खटला चालल्यानंतर न्यायालयाने भानुदास कोतकर त्याचे पुत्र संदीप, सचिन अमोल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चारही आरोपींनी ही शिक्षा रद्द व्हावी, यासाठी अपील केले होते. तसेच संदीप, सचिन अमोल कोतकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने हे अर्ज फेटाळले, अशी माहिती मूळ फिर्यादी राऊत यांनी दिली. राऊत यांच्यातर्फे अॅड. अनिलकुमार पाटील यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...