Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | krishnaprakash reveals about his fitness

शारीरिक आणि मानसिक स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाचे !

सचिन चोभे | Update - Oct 21, 2011, 09:06 AM IST

‘हम सारी जिंदगी सेहत गवाकर पैसा कमाते रहे, फिरभी उसी पैसे से आरोग्य वापस नही ला सकते ।

  • krishnaprakash reveals about his fitness

    नगर - ‘हम सारी जिंदगी सेहत गवाकर पैसा कमाते रहे, फिरभी उसी पैसे से आरोग्य वापस नही ला सकते । इसलिए अपने आरोग्य के साथ समाज और मानवता को भी समय दो । बदन बनाओ ... देश बचाओ/ उसका दुरूपयोग मत करो । आरोग्यशील बनते हुए पहलवान नही, समाजसेवक बनो । बदन बनाके किसीका गुलाम मत बनो, शारीरिक और मानसिक स्वातंत्र्य कायम रखो,’ असा सल्ला जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश देतात.
    नाशिक विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेत नगरकरांना कृष्णप्रकाश यांच्या खिलाडूवृत्तीची झलक पहायला मिळाली. गुन्हेगारांना धडकी भरवणाºया कृष्णप्रकाश यांच्या कार्यक्षमतेचे रहस्य त्यांचा फिटनेस हे आहे.
    कृष्णप्रकाश यांचे प्राथमिक शिक्षण गोराम्बे (जि. रामगढ, झारखंड) या जन्मगावी झाले. गावातील स्वर्णरेखा नदीत ते पोहायला शिकले. तासन्तास डुंबत बसण्याचा छंदच त्यांना जडला. मित्रांसमवेत ते फुटबॉलही खेळत. हजारीबाग शहरात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तेथील सेंट कोलंबा कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. तेथेही स्विमिंग सुरूच राहिले. हॉकी हा त्यांचा आवडता खेळ बनला.
    1999 मध्ये हैदराबाद येथील इंडियन पोलिस अकादमीत असताना कृष्णप्रकाश फुटबॉल टीमचे कॅप्टन होते. त्यांच्या संघाने अनेकदा विजयी कामगिरी नोंदवली. स्विमिंग व क्रॉसकंट्री स्पर्धेतही रनर अप म्हणून त्यांनी ठसा उमटवला.

Trending