आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज: जिथे आहात तिथे तरी नीट रहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी तालुक्यातील एका महाविद्यालयाचा परिसर. एका उमेदवाराचे सर्मथक विद्यार्थ्यांबरोबरच हितगुज साधण्यासाठी लगबगीने कॅम्पसमध्ये शिरले. परीक्षा, अभ्यासाच्या गप्पा मारल्या. अमुक उमेदवाराला मतदान करा, सर्वसामान्यांची नाळ त्यांच्याशी जोडली असून विविध मार्गांनी गेली चाळीस वष्रे ते सार्वजनिक प्रश्‍नांशी संबंधित आहेत वगैरे गुणगान ते गाऊ लागले. महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असून पोरांनी काहीही विचार न करता आम्ही या निवडणुकीपुरते नरेंद्र मोदींबरोबर आहोत, तुमचा विचार नंतर करू, असे सांगितले. तेव्हा कार्यकर्ते म्हणू लागले, अहो, मोदी चांगलेच आहेत. आमच्या नेत्यानेसुद्धा तिकडे चाचपणी केली होती. उमेदवारी न मिळाल्याने स्वतंत्र डाव टाकावा लागला. निवडणुकीनंतर आम्ही त्यांचेच होणार आहोत. विचार एक असल्याने आम्हाला मतदान करा. त्यावर विद्यार्थी म्हणाले, जिथे आहात तिथे तरी नीट रहा राव. खरचं तसे असेल, तर नमोचा प्रचार करा. या प्रकाराची सध्या चर्चा सुरू आहे.
हातून पैसा सुटेना..
लोकसभेचा प्रचार जोरदार सुरू आहे, पण खासदार दिलीप गांधी यांच्या नावाचे प्रचार फलक मोजक्याच ठिकाणी दिसतात. प्रचारात पिछाडी परवडणार नसल्याची जाणीव असतानाही उमेदवाराकडून पैसा सुटेना अशी चर्चा नगर येथील महात्मा फुले चौकात चहाच्या टपरीवर सुरू होती. राजीव राजळे यांचे फलक व प्रचाररथ सर्वत्र दिसत आहेत. पण मोदींच्या लाटेचा अतिआत्मविश्वास गांधींना असल्याने त्यांच्याकडून प्रचाराला समाधानकारक पैसा सुटेना. अशीच परिस्थिती राहिली, तर गांधींना निवडणूक जड जाईल, अशी चर्चा चहाच्या फुरक्याबरोबर सुरू होती.