आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kukadi Elections: Shelar Pachpute Battle Against Jagtap

'कुकडी' निवडणूक : जगताप विरोधात शेलार-पाचपुते यांची लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - कुकडी साखर कारखान्यासाठी येत्या २० एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. 'कुकडी'चे संस्थापक कुंडलिराव जगताप बिनविरोध विजयी झाले. जगताप विरोधात माजी मंत्री बबनराव पाचपुते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळपासूनच गर्दी उसळली होती. सेवा संस्था गटातून कुंडलिराव जगताप अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाल्याचे घोषित झाल्याने त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मावळत्या संचालक मंडळावर जगताप यांचे पूर्ण वर्चस्व होते. २६ पैकी फक्त सहा जणांना जगताप गटातून संधी मिळाली. उर्वरितांना डच्चू मिळाला. एकनाथ बारगुजे बाळासाहेब ओगले यांच्या ऐवजी त्यांच्या सौभाग्यवतींना स्थान मिळाले. 'कुकडी'ची ही तिसरी निवडणूक आहे. पहिली निवडणूक बिनविरोध झाली होती. मागील निवडणुकीत निम्म्यापेक्षा जास्त जागा बिनविरोध झाल्या होत्या. तुलनात्मक विचार केला, तर जगताप यांच्याविरोधात प्रथमच सबळ पॅनेल रिंगणात उतरला आहे. या पॅनेलचे नेतृत्त्व स्वतः पाचपुते करीत असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहे.

गटनिहाय दोन्ही पॅनेलची नावे- हिंगणी गट : रामदास इधाटे, मच्छिंद्र डोंगरे, दादाभाऊ वाखारे (तिघे पाचपुते-शेलार गट), सुभाष वाघमारे, बाजीराव मुरकुटे, निवृत्ती वाखारे (जगताप गट). राजापूर गट- श्रीपाद कवाष्टे, अनिल वीर, बाळासाहेब पवार (पाचपुते-शेलार गट), विवेक पवार, मनोहर वीर, बाळासाहेब भोंडवे (जगताप गट). पिंपळगाव पिसा -मच्छिंद्र शिंदे, गौतम भोसले, दिनकर पंदरकर (पाचपुते-शेलार गट), आमदार राहुल जगताप, अंकुश रोडे, धनंजय शिंदे, (जगताप गट). कोळगाव- मधुकर इथापे, धोंडिबा लगड (पाचपुते-शेलार गट), विनायक लगड, प्रल्हाद इथापे (जगताप गट). भानगाव- मधुकर टकले, घनश्याम शेलार (पाचपुते-शेलार गट), सुभाष डांगे, मोहन कुदांडे (जगताप गट). अनुसूचित जाती-गौतम पवार (पाचपुते-शेलार गट), उत्तम शिंदे (जगताप गट). महिला राखीव- आशाबाई कोठारे, कल्याण ओहोळ (पाचपुते-शेलार गट), लताबाई बारगुजे, ललिता ओगले (जगताप गट). ओबीसी राखीव-दिलीप गायकवाड (पाचपुते-शेलार गट), विश्वास थोरात (जगताप गट). भटक्या जाती-जमाती राखीव-युवराज तिखोले (पाचपुते-शेलार गट), सुखदेव तिखोले (जगताप गट). सेवा संस्था गट-कुंडलिराव जगताप (बिनविरोध विजयी) यांचा निवडणूक रिंगणात असलेल्यांत समावेश आहे.

कुकडी बचाव पॅनेलवर बबनराव पाचपुतेंचा वरचष्मा
माजीमंत्री बबनराव पाचपुते राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी स्थापन केलेल्या कुकडी बचाव पॅनेलवर पूर्णपणे पाचपुतेंचा वरचष्मा असल्याचे उमेदवार यादीतून दिसून आले. १९ पैकी अठरा जागांसाठी शेलार समर्थकांना चार जागेवर संधी मिळाली. उर्वरित जागांवर पाचपुते समर्थकांचा भरणा स्पष्ट दिसत आहे.