आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुकडी प्रकल्पात 37% साठा; आठ दिवसांतच आलेल्या पाण्याने श्रीगोंदेकरांत आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने कुकडीच्या एकूण पाणीसाठ्यात बुधवारी सकाळपर्यंत 37 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या आठवड्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या धो-धो पावसाने धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढू लागला. सुमारे 36 टीएमसीची एकूण साठवण क्षमता असणा-या कुकडी प्रकल्पात बुधवारी सकाळपर्यंत अकरा टीएमसी पाणी जमा झाले होते. सव्वा टीएमसीचे वडज धरण सत्तर टक्के भरले असून ते केव्हाही ओव्हरफ्लो होऊ शकते. येडगाव धरणाची पाणीपातळी साठ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सर्वात कमी पाणीसाठा पिंपळगाव जोगे धरणात 18 टक्के आहे. साडेदहा टीएमसीच्या माणिकडोह धरणात देखील अवघा 27 टक्के साठा आहे. गतवर्षी या दिवशी कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा 68 टक्के इतका होता. कुकडी समूहातील धरणांमध्ये बुधवारपर्यंतचा एकूण पाणीसाठा 37 टक्के आहे. विसापूर धरणात 1 टक्का पाणीसाठा आहे, तर सीना व खैरी यात अद्याप नवीन पाण्याची आवक झाली नाही.
श्रीगोंदे, कर्जत व कर्नाळा या तीन तालुक्यासह पुणे जिल्ह्याचे देखील कुकडीच्या पाणलोट क्षेत्राकडे लक्ष लागले आहे. दोन महिने वरुण ाजाने लपंडाव केल्याने नगर, पुणे व सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकरी चिंतेत होते. आठ दिवसांत कुकडीच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने श्रीगोंदेकरांचा आनंद दुणावला आहे. घोड धरणात उपयुक्त साठा शून्य घोड धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. अचल पाणीसाठा वापरात आणता येत नसल्याने त्याचा तूर्तास तरी काहीही उपयोग नाही. डिंभे धरण निम्मे भरले असल्याने घोड धरणाच्या लाभक्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. कारण डिंभे धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतरच ते पाणी घोड धरणात साठवले जाते. त्या दृष्टीने डिंभे केव्हा भरते, याकडे घोडवासीयांचे लक्ष लागले आहे.