आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कुकडी’वरील जोड कालव्याचे गेेट आमदार जगतापांनी तोडले; पाण्यासाठी लोकप्रतिनिधी आक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- कुकडीच्या अावर्तनातून तालुक्याला फक्त पिण्यासाठीच नव्हे, तर फळबागांसाठीही पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करत कुकडी कालव्यावरील किलोमीटर १३२ क्रमांकाच्या जोड कालव्याचे प्रशासनाने वेल्डिंग करून बंद केलेले गेट आमदार राहुल जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेऊन मंगळवारी तोडले. 

घारगाव येथील कालव्यावर जगताप यांनी कार्यकर्त्यांसमवेत गेटतोड आंदोलन केले. यावेळी ते म्हणाले, श्रीगोंद्यातील फळबागांना पाणी मिळाल्याशिवाय खाली पाणी जाऊ देणार नाही. कुकडी पाणीप्रश्नावर फक्त गप्पा मारून उपयोग नाही, तर त्यासाठी आता थेट कृती करावी लागणार आहे. धरणातील उपलब्ध पाण्यापैकी एक टीएमसी पाणी वाढवून दिल्यास कुकडी लाभक्षेत्रातील फळबागांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. 

यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, अख्तार शेख, निंभोरे मेजर, बबनराव बोडखे, शांताराम पोटे, भय्या वाबळे, ऋषिकेश गायकवाड, सुनील पाटील यांची भाषणे झाली. अप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब जगताप, विलास वाबळे, फक्कड मोटे, दादा औटी, मिथुन नगरे, भाऊ डांगे, विलास म्हस्के, कुमार लोखंडे, भाऊसाहेब खेतमाळीस, दत्तात्रय हिरवे, दत्ता शिर्के, रोशन निंभोरे आदी यावेळी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...