आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kulkarni Facilitated By Maharashtra Sahitya Parishad For Navranga Poem Collection

‘नवरंग’ चारोळी संग्रहाबद्दल कुलकर्णींचा मसापतर्फे सत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॉटस्-अॅप ग्रूपतर्फे ‘नवरंग’ चारोळी संग्रह प्रकाशित केल्याबद्दल अरविंद कुलकर्णी त्यांच्या पत्नी प्रमिला यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेच्या सदस्यांनी सत्कार केला.
नगर - सोशल मीडियामार्फत व्हॉटस् अॅप ग्रूपतर्फे ‘नवरंग’ चारोळी संग्रह प्रकाशित केल्याबद्दल अरविंद कुलकर्णी त्यांच्या पत्नी प्रमिला यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेच्या सदस्यांनी सत्कार केला. महाराष्ट्रातील विविध भागांतील नवोदित साहित्यिक एकत्र येतात. ते एकमेकांना कधी भेटत नाहीत, पण व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून असे काहीतरी विधायक घडवतात हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मसापचे सरचिटणीस जयंत येलूलकर यावेळी बोलताना म्हणाले.

सावेडीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात साहित्य मंथनच्या व्हॉटस् अॅप ग्रूपने ‘नवरंग’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन केले. त्यामागे कुलकर्णी यांचे परिश्रम आहेत. त्याबद्दल मसापचे कार्याध्यक्ष भालचंद्र बालटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन कुलकर्णी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास मसापचे कार्यकारिणी सदस्य दीपाली देऊतकर, कोषाध्यक्ष स्नेहल उपाध्ये, शारदा होशिंग, राजन उत्तेकर, तसेच लेखकांची सूची तयार करणारे शब्बीर शेख उपस्थित होते.
कुलकर्णी यांचे हे योगदान अतुलनीय असल्याचे बालटे यांनी सांगितले. उपाध्यक्ष सदानंद भणगे यांनी नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, असे विचार यावेळी मांडले. नंदकुमार आढाव म्हणाले, कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील हौशी साहित्यिकांची मोट बांधण्याचे केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून विधायक कार्य करू शकतो, हे कुलकर्णी यांच्या प्रयत्नांतून दिसते.

सुरेश चव्हाण यांनी यावेळी काही चारोळ्या सादर करून कुलकर्णी यांचे कौतुक केले.