आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन सिटीसाठी 'एल अँड टी'चा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लार्सनअँड टूब्रो (एल अँड टी) कंपनीने नगर शहर हरित करण्याचा विडा उचलला आहे. कंपनीने पत्रकार चौकात अतिशय सुंदर उद्यान उभारले आहे. लवकरच त्याचा विस्तार केला जाणार आहे. याशिवाय तीन चौकांचे सुशोभीकरणही कंपनीने केले आहे. 'दिव्य मराठी'ने नगर शहर उद्यानांचे शहर करण्यासाठी अभियान हाती घेतल्यावर त्याला प्रतिसाद म्हणून आणखी उद्यान विकसित करण्याची शहरात शक्य तेथे वृक्षलागवड करण्याची कंपनीची तयारी आहे.
भकास हिरवाईविना शहर किंवा कोणत्याही परिसरात मन रमत नाही. नगर शहरही अलीकडील काही वर्षांत तसे बनत चालले होते. येथे उद्यानांची कमतरता आहे. विविध कारणांनी जुनी झाडे तोडली जातात, शिवाय नव्याने वृक्षलागवड होत नाही. त्यामुळे शहर भकास होण्याचा धोका होता. महापौर झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने शहर हरित करण्यासाठी काही संस्था पुढे आल्या. एल अँड टी कंपनी याबाबत कायम आघाडीवर राहिली. ही एमआयडीसीतील सर्वांत मोठी कंपनी आहे. नगरच्या एमआयडीसीचे ती खास वैशिष्ट्य मानले जाते. कंपनीने आपला सर्व परिसर वृक्षलागवड करून हरित अतिशय सुंदर बनवला आहे. त्यासाठी कंपनीतून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया करून शेततळ्यासारख्या कृत्रिम तळ्यात साठवले जाते. तेथून ते झाडांना पुरवले जाते. कंपनीने इंच इंच हिरवा केला आहे. कंपनीच्या परिसरात गेल्यावर एमआयडीसीतील कंपनीत गेल्यासारखे वाटत नाही. इतकी दाट झाडे तेथे आहेत. त्यात प्रचंड विविधताही आहे.

एवढे करून कंपनीचे अधिकारी स्वस्थ बसले नाहीत. ज्या शहरात आपण उद्योग चालवतो, त्याचे काही अंशी तरी उतराई होण्याचे कंपनीचे धोरण आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांतील सिग्नलच्या देखभालीचे (मेंटेनन्स) काम कंपनीच स्वत:ची यंत्रणा वापरून करते.

कंपनीचे सह सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर मूळचे नगर जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे त्यांना शहराबद्दल विशेष आस्था आहे. शिवाय पर्यावरणविषयक दृष्टिकोन असल्याने त्यांनी शहरात महापालिकेने दिलेल्या भूखंडावर सुंदर उद्यान उभारले. तेथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमला. महापालिकेच्या उद्यानांची स्थिती भकास असताना पत्रकार चौकातील हे उद्यान मात्र आपली हिरवाई कायमस्वरूपी टिकवून आहे. हे उद्यान जेथे आहे. तेथे शहरातील कचरा टाकला जायचा. आता हा कोपरा कायमचा हरित सुंदर झाला आहे. या उद्यानाचा आता विस्तार करण्यात येणार आहे. सध्याच हे उद्यान परिसरातील नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण झाले आहे. त्याचा विस्तार झाल्यावर ते अधिकच देखणे होणार आहे.

या उद्यानाशिवाय आणखी एक चांगले उद्यान विकसित करण्याची कंपनीची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन कंपनीकडे प्रस्ताव देण्याची गरज आहे.

उद्यानासाठी नियम शिथिल
शहर सुंदर हरित करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. शहरात कोणताही मोकळ्या भूखंडावर उद्यान विकसित करायचे असल्यास खासगी संस्था व्यक्तींनी पुढे यावे. उद्यान विकसित करून त्यास त्यांनी त्यांचे नाव दिले तरी चालेल. यापुढे उद्यान उभारण्यासाठी मनपाच्या किंवा स्थायीच्या परवानगीची आवश्यकता राहिलेली नाही. असा प्रस्ताव आल्यास महापािलका प्रशासन त्याला तातडीने परवानगी देईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.''
- संग्राम जगताप, आमदारतथा महापौर.

तीन चौकांचे सुशोभीकरण
एलअँड टी कंपनीने नगर शहरातील तीन चौकांचे ुशोभीकरण केले आहे. त्यांत अरणगाव, अप्पू हत्ती चौक पत्रकार चौकाचा समावेश आहे. या चौकांतही कंपनीने हिरवाई विकसित केली आहे. कंपनीने एकदा काम पूर्ण केल्यावर त्याची देखरेखही अतिशय काटेकोरपणे केली जाते. त्यामुळे हे चौक देखणे झाले आहेत. इतर कंपन्यांनीही अशा कामाचा आदर्श घेऊन चौक सुशोभित केले, तर नगर शहर सुंदर हरित होण्यास वेळ लागणार नाही.

सामाजिक बांधिलकी जपतो
कंपनीचेसहसरव्यवस्थापक पारगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सुशोभित करण्याचा प्रयत्न आहे. तीन चौक सुशोभित केले असून आणखी काही चौक सुशोभित करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाला दिले आहेत. सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न आहे'' नागेश्वर आढाव, मानवसंसाधन विभागप्रमुख, एल अँड टी.

पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न
नगर शहरात हिरवाई फुलवण्यासाठी कंपनीची कायम तयारी आहे. नगर शहर हरित सुंदर व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कंपनी कायम पर्यावरण रक्षण संवर्धनाचे काम करण्यात आघाडीवर असते. कंपनीचा विशाल परिसर आम्ही हिरवा केला आहेच, पण आम्ही नगर शहरातही हे काम करत आहोत. एल अँड टीचे पत्रकार चौकातील उद्यान हे त्याचे एक उदाहरण आहे. संधी मिळाल्यास असे काम दुसरीकडेही करण्याची आमच्या कंपनीच्या व्यवस्थापनाची तयारी आहे.''
अरविंद पारगावकर, सहसरव्यवस्थापक,एल अँड टी.
पुढील स्लाईडवर पाहा, ग्रीन सिटीचे इतर फोटो..