आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल व्यवस्थापना अभावी पाण्याची अापत्ती - प्रदीप पुरंदरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - राज्यातील पाण्याचा लढा हा आता अकोले तालुक्यात प्रवरा खोऱ्यातून सुरू झालेल्या लढ्यातून पुढे नेला पाहिजे. मराठवाड्यात पाण्यावरून जिल्ह्या-जिल्ह्यात तीव्र संघर्ष करावा लागतो. मात्र, मराठवाड्यात सांगितले जाते, तशी पाण्याची समस्या इतकी वाईट नाही. खरे तर फक्त ६२ टीएमसी उपलब्ध पाण्यावर ईस्राइलने योग्य नियोजन करून जगासमोर एक आदर्श निर्माण केला. मात्र, आपल्याकडील जल व्यवस्थापन नीट केले जात नसल्यामुळेच कोरडा विकास होत आहे. आपल्याकडे जलव्यवस्थापन होत नसल्याने सर्वांनाच पाण्याच्या अापत्ती व्यवस्थापनाकडे जावे लागत आहे, असे प्रतिपादन जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पाणी हक्क संघर्ष समिती नगर याच्या वतीने बुधवारी अकोल्यात पाइप कालवे धोरणाची अंमलबजावणी पाण्याच्या हक्कांसाठी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाणी हक्क संघर्ष समितीच्या बैठकीत डॉ. अजित नवले यांनी याबाबतचा मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जल परिषदेचे अध्यक्षपदी किसान सभेचे तालुका अध्यक्ष यादवराव नवले होते.

प्रदीप पुरंदरे म्हणाले, सन १९७० साली सुरू करण्यात आलेल्या निळवंडे धरणाचे काम ७.९३ कोटींहून आज २१०७ कोटी रुपयांचे झाले. अजूनही या धरणाच्या खर्चात किती वाढ होईल ते सांगता येणार नाही. सद्यस्थितीत महाराष्ट्रातून ६०० रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लाख कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, आपले पाटबंधारे विभागाचे बजेट खूपच कमी आहे, असेही प्रदीप पुरंदरे यांनी सांगितले.

डॉ. अजित नवले म्हणाले, जोपर्यंत अकोले तालुक्यात विमोचकासह भूमिगत बंदिस्त पाइप कालव्याचे काम सुरू केले जात नाही, तोपर्यंत सद्यस्थितीत कोणत्याही परिस्थितीत कालव्यांची किंवा धरणाच्या संबंधित इतर कोणत्याही प्रकारची कामे सुरू करू दिली जाणार नाहीत. यावेळी यादवराव नवले, चंद्रभान भोत, विनय सावंत, शांताराम गजे, विठ्ठल शेवाळे, अशोक आरोटे, शरद देशमुख, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, सुरेश भोर, अॅड. ज्ञानेश्वर काकड, बापू भांगरे, अशोक आरोटे, शरद देशमुख, बाळासाहेब वाळूंज, खंडू वाकचौरे, आबाजी धुमाळ, कैलास घोडके, बाळासाहेब घोडके, सुभाष मालुंजकर, मोहन देशमुख यावेळी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...