आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणामध्ये महिलांनी सक्रिय व्हावे : उमा खापरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सन 2014 मध्ये होणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये यशस्वी होण्यासाठी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच प्रयत्न करावेत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबवावे. आता स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. या संधीचा फायदा घेऊन महिलांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष प्रदेश महिला मोर्चाच्या सचिव उमा खापरे यांनी केले.

जिल्ह्यात भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अंतर्गत नगरच्या भाजप कार्यालयात झालेल्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत खापरे बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते महिला आघाडीच्या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला.

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा विद्ये, हर्षदा काकडे, उपमहापौर गीतांजली काळे, शहराध्यक्ष आशा विधाते, पाथर्डीच्या आरती निराळे, र्शीगोंद्याच्या सुवर्णा पाचपुते, जामखेडच्या अर्चना राळेभात, प्रिया जानवे, कल्पना पंत, कमोदिनी जोशी, मालन ढोणे, रत्नमाला उदमले, विशाखा पटेल, सीमा चव्हाण, अल्पना घोडके आदी यावेळी उपस्थित होते.

खापरे म्हणाल्या, सामाजिक क्षेत्रात परिवर्तन घडवण्याची क्षमता महिलांमध्ये असते. याकरिता प्रत्येक महिलेला भेटून कार्यकर्त्याने पक्षाची भूमिका व विचार पोहोचवावेत. जेणेकरून जिल्ह्यातून जास्तीत जास्त महिलांची सदस्य नोंदणी होईल.

विद्ये म्हणाल्या, शहर व जिल्ह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात महिला भाजपच्या पाठीमागे कायमच उभ्या असतात. त्यामुळे सदस्य नोंदणी अभियानास सर्वत्र मोठय़ा प्रतिसाद मिळेल. महिलांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन तेथील महिलांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त सभासदांची नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.