आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lande Murder Case: Milind Mobharkar Investigation Completes

लांडे खून प्रकरण: मिलिंद मोभारकरांची सरतपासणी पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणातील पंच मिलिंद मोभारकर यांची सरतपासणी बुधवारी पूर्ण झाली. हा खटला नाशिकच्या सत्र न्यायालयात सुरु आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे, कागदपत्रे, हस्ताक्षर नमुने अशा सात पंचनाम्यांमध्ये मोभारकर पंच होते. बुधवारी सकाळी सरकारी वकील विजय मिसर यांनी सुमारे अडीच तास त्यांची सरतपासणी घेतली. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्यासमोर सुरु आहे. मोभारकर यांची सरतपासणी पूर्ण झाल्यानंतर आरोपींचे वकील धैर्यशील पाटील हर्षद निंबाळकर यांनी उलटतपासणी घेण्यासाठी मुदत मागितली. त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे.

दरम्यान, मोभारकर यांना २८ १९ मार्चला अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन धमकी आल्याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे खटल्यात सरकार पक्षाला मदत करू नये, असा दबाव येत असल्याची लेखी तक्रार मोभारकर यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात केली आहे.