आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारीची काच फोडून लॅपटॉप लांबवला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सहकार सभागृहासमोरील एचडीएफसी बँकेसमोर उभ्या केलेल्या पेजोरो (एमएच 18 के 101) मोटारीतील पैशांची बॅग लांबवण्यासाठी चोरट्यांनी काच फोडली. मात्र, बॅग त्यांच्या हाती लागली नाही. त्यामुळे लॅपटॉप घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. मंगळवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली. बांधकाम व्यावसायिक कमलाकर साहेबराव पाटील (देवपूर, धुळे) हे व्यावसायिक कामानिमित्त नगरला आले होते. दुपारी एक वाजता ते सहकार सभागृहासमोरच्या एचडीएफसी बँकेत गेले. गाडी नगर-पुणे रस्त्याच्या बाजूला लावली होती. चालक दीपक श्यामराव जाधव (देवपूर) गाडीतच बसला होता. पाटील यांनी बँकेतून मोठी रक्कम काढली व चालकाला फोन करून बॅग घेऊन बँकेत बोलावले. रक्कम बॅगेत ठेवून त्यांनी ती गाडीत ठेवण्यासाठी चालकाकडे दिली. ही बॅग आत ठेवून चालक गाडीतच बसला. एका व्यक्तीने दुरून हातवारे करून मालक बँकेत बोलावत असल्याचे चालकाला सांगितले. चालकाने गाडी लॉक करून बाहेर येत पाटील यांना फोन केला. तेवढय़ात चोरट्याने चालकाच्या मागील दरवाजाची काच फोडून मधल्या सीटवर ठेवलेली बॅग लांबवली. चालकाने आरडाओरड करत गाडीचे लॉक काढून रक्कम ठेवलेली बॅग सुरक्षित असल्याची खात्री केली. बँकेतच नजर ठेवून चोरट्यांनी ही योजना आखल्याचे निष्पन्न आले. मात्र, मोठय़ा रकमेवर हात मारण्याची चोरट्यांची योजना फसली व त्यांच्या हाती लॅपटॉपसह 32 हजार 500 रुपयांचा ऐवज हाती लागला.