आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणी मावळा बलात्कार खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोणी मावळा (ता. पारनेर) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याच्या खटल्यात सरकार पक्षाचा अंतिम युक्तिवाद सुरू झाला आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये शाळकरी मुलीवर तिघा नराधमांनी बलात्कार करुन तिचा खून केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सव्वादोन तास युक्तिवाद केला. 

या खटल्यात सरकार पक्षाने एकूण ३२ साक्षीदार तपासले आहेत. घटनाक्रम पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसले, तरी परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी अॅड. निकम यांनी साक्षीपुराव्यांच्या आधारे सिद्ध केल्याचे सांगितले. पीडित मुलीला शाळेतून घरी जाताना आरोपी संतोष लोणकर, मंगेश लोणकर दत्ता शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी छेड काढून बलात्कार करुन खून करण्याची धमकी दिली होती. हा प्रकार तिने मैत्रिणीला सांगितला होता. या साक्षीदार असलेल्या मैत्रिणीचा उल्लेख अॅड. निकम यांनी “खरी रणरागिणी’ म्हणून केला. 

आरोपींनी पीडित मुलीचा शाळा सुटल्यानंतर पाठलाग केला. तिच्यावर बलात्कार करुन स्क्रू डायव्हर डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला. तत्पूर्वी त्यांना काही साक्षीदारांनी पाहिले होते. आरोपींनी पीडितेच्या नाकातोंडात चिखल कोंबून पुरावे नष्ट करण्याचा तिची ओळख पटू देण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेला स्क्रू ड्रायव्हर दगड जप्त केला होता. आरोपींनी केलेल्या क्रौर्याचेही वर्णन अॅड. निकम यांनी केले. 

पारनेर पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी तिन्ही आरोपींना अटक केली होती. त्यावेळी आरोपींची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या अंगावर जखम आढळल्या होत्या, असेही निकम म्हणाले. 

गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांवर असलेला चिखल, रक्ताचे डाग, आरोपींच्या कपड्यांवर असलेले रक्ताचे डाग चिखल जुळत असल्याचे रासायनिक तज्ज्ञांनी सांगितले, असेही निकम युक्तिवादात म्हणाले. सुमारे दोन ते सव्वादाेन तास त्यांचा युक्तिवाद चालला. शनिवारीही पुन्हा उर्वरित युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर आरोपींचे वकील त्यांचा अंितम युक्तिवाद करतील. 
बातम्या आणखी आहेत...