औरंगाबाद - अहमदनगर रस्त्यावर अपघात, एकाच कुटुंबातील चार ठार
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
अहमदनगर - येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास जीप आणि कंटनेरची धडक झाली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झालेत. ही दुर्घटना पांढरीपुलाच्या घाटात घडली.
सर्व मृत एकाच कुटुंबातील या अपघात ठार झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील असून, ते घोडेगावचे रहिवासी आहेत. ते अहमदनगरहून जीपने घोडेगावला जात होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरचा आणि जीपची टक्कर झाली.