आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख डॉलरचा सन्मान: कॅनडातील विद्यापीठाचा पुरस्कार अण्णांना प्रदान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने यंदापासून सुरू केलेला अलार्ड प्राईज 2013 हा एक लाख कॅनेडियन डॉलरचा प्रथम पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी (25 सप्टेंबर) रात्री प्रदान करण्यात आला. हजारे यांना आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये हा सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे.

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने 25 ऑगस्ट रोजी हजारे यांच्यासह बांगलादेशातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ़ सीमा समर व लंडनच्या ग्लोबल विटनेस या समाजसेवी संस्थेची या पुरस्कारांसाठी निवड केली होती. हजारे यांना एक लाख डॉलरचा प्रथम, सीमा समर व ग्लोबल विटनेस या स्वयंसेवी संस्थेस अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी 25 हजार कॅनेडियन डॉलरच्या पुरस्कार घोषित केला होता.

बुधवारी रात्री या पुरस्कारांचे कॅनडात वितरण करण्यात आले. हजारे यांच्या स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधीच्या खात्यावर या पुरस्काराची रक्कम जमा होणार असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनच्या कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी दिली.