आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : सामाजिक कार्यकर्त्‍या तिस्ता सेटलवाड यांना जामीन मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिस्ता सेटलवाड - Divya Marathi
तिस्ता सेटलवाड
मुंबई- गुजरातमधील सामाजिक कार्यकर्त्या व गोध्रा हत्याकांडानंतर प्रकाशझोतात आलेल्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती चालवत असलेल्या दोन स्वयंसेवी संस्थांत परकीय चलन नियंत्रण कायद्या (फेमा)चे उल्लंघन झाल्याप्रकरणी गुन्‍हा दाखल आहे. या प्रकरणी न्‍यायालयाने आज (मंगळवार) सिस्‍ता यांना यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. तिस्ता सेटलवाड या कट्टर मोदी विरोधक आहेत.
नेमका आहे आरोप
सेटलवाड यांच्या मेसर्स सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिशिंग प्रा.लि. या कंपनीला आणि त्यांचे पती व SBCLचे संचालक जावेद आनंद अख्तर, पेशीमम गुलाम मोहम्मद आणि आणखी एका अज्ञात संचालकाविरोधात चौकशी सुरु आहे. सेटलवाड यांच्या या संस्थेला अमेरिकेतील फोर्ड फाउंडेशनकडून एसीआरए नियमांचे उल्लंघन करून 3 कोटी रूपये स्वीकारल्याचा व त्याची माहिती दडविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिकेशन प्रा.लि या संस्थेच्या नावाखाली हे दोघे कम्युनॅलिझम कॉम्बॅट नावाचे एक नियतकालिक चालवत होते. या नियतकालिकाचे हे दोघेही मुद्रक, प्रकाशक व सहसंपादक होते. परकीय चलन नियंत्रण कायद्यानुसार कुठल्याही स्तंभलेखक, व्यंगचित्रकार, प्रकाशक, मुद्रक, प्रतिनिधी, संपादक यांना परदेशी देणग्या स्वीकारता येत नाहीत. मात्र, सेटलवाड यांनी सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिकेशन प्रा.लि च्या अंतर्ग कॉम्बॅट नियतकालिक चालविल्याचा आरोप आहे.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करा...पुढील बातम्या अशा
- यवतमाळच्‍या पोलिस मुख्यालयात कॉन्स्टेबलने घेतले विष
- कार-कंटेरनचा अपघात; एक ठार, चार गंभीर
- पाचवीतील मुलाने केला 'केजी टू'च्‍या मुलीचा विनयभंग
- कारच्‍या धडकेत एक ठार; एक गंभीर मुंबई येथील घटना
- अण्‍णा केजरीवालांची साथ सोडा; अन्‍यथा जिवे मारू !
- पाच व्हॉटस्‌अॅप ग्रुपविरुद्ध पंढरपुरात गुन्‍हा दाखल
- नाशकात माथेफिरूने जाळल्या दुचाकी