आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधी शाखेच्या परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधीशाखेच्या अभ्यासक्रमाची परीक्षा इंग्रजीबरोबरच मराठीतूनही घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक व्ही. बी. नागवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विधी शाखेला प्रवेश घेतात, परंतु इंग्रजीमुळे त्यांची मोठी अडचण होते. त्यामुळे ही परीक्षा मराठी भाषेतून घ्यावी, अशी मागणी मनविसेने केली.

मुंबई विद्यापीठ वगळता संपूर्ण राज्यात विधी शाखेतील परीक्षा इंग्रजी माध्यामातून होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एलएलबी तीन वर्ष बीएएलएलबी पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा मराठीतून घेण्यास मान्याता दिली होती. परंतु नंतर लगेच या परीक्षा मराठीतून घेता इंग्रजी भाषेतून घेण्याचे परिपत्रक काढले. मुंबई विद्यापीठात मराठी इंग्रजी दोन्ही भाषेतून विधी शाखेच्या परीक्षा घेण्यात येतात. पुणे विद्यापीठातदेखील याच पध्दतीने या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी मनविसेने केली. भारतातील कायदे इंग्रजी भाषेतून आहेत. मराठीतून परीक्षा घेतली, तर त्याचा विद्यार्थ्यांना काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे पुणे विद्यापीठाने इंग्रजी भाषेतूनच परीक्षा घ्यावी, अशी मागणी बार कौन्सिलने केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षांमध्ये असा भेदभाव का, असा सवाल मनविसेने उपस्थित केला आहे. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित, जिल्हाध्यक्ष वैभव सुरवसे, जिल्हा सचिव समित वर्मा,अभिषेक मोरे आदी उपस्थित होते.

अॅकॅडमीक कौन्सिलचा निर्णय
विद्यापीठानेहा निणर्य घेतला होता, परंतु ही परीक्षा इंग्रजीतूनच घ्यावी, अशी मागणी बार कौन्सिलने विद्यापीठाकडे केली होती. त्यानुसार परीक्षा इंग्रजीतून घेण्याचा निर्णय झाला आहे.'' व्ही.बी. नागवडे, संचालक, विद्यापीठ उपकेंद्र
बातम्या आणखी आहेत...