आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील संघाचा 'कोतवाली पोलिस ठाण्यावर मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलिस, वकील व न्यायाधीशांना शिवीगाळ करणारा कुख्यात गुंड पाप्या ऊर्फ सलिम ख्वाजा शेख व त्याचा साथीदार विनोद सुभाष जाधव यांच्याविरूद्ध केवळ सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचे वाढीव कलम लावण्याच्या मागणीसाठी वकिलांनी बुधवारी दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. स्वतंत्र फिर्याद, जबाब देण्याच्या मुद्दयावर वकिलांनी आंदोलन मागे घेतले.

पोलिस कर्मचारी शिवाजी रोहोकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पाप्या व जाधवविरुद्ध दाखल झाला आहे. मात्र, तत्पूर्वी वकिलांनीच त्यांच्या नावे फिर्याद बनवून पोलिसांकडे दिली होती. यात खुनाच्या प्रयत्नाचे 307 कलमही समाविष्ट होते. मात्र, रोहोकले यांची स्वाक्षरी नसल्याने पोलिसांनी ही फिर्याद घेतली नाही. रोहोकले यांच्या म्हणण्यानुसार सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद नोंदवून घेण्यात आली.

वादामुळे नोंद नाही

पाप्याविरूद्ध आणखी गंभीर गुन्हा दाखल होण्यात पोलिस व वकिलांमधील वाद आडवा आला. न्यायालयाच्या आवारात गुटखा खाऊन थुंकणार्‍यांना यापूर्वी दंड झाला आहे. मात्र, सिगारेट ओढणारा पाप्या कारवाईतून वाचला. पोलिसांची स्टेनगन हिसकावण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र, पोलिस व वकिलांमधील समन्वयाअभावी त्याच्याविरूद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद झाली नाही.

पाप्या शेखविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून वकिलांनी पोलिसांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.