आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटीतून शालेय साहित्यास सूट द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शालेय साहित्य स्थानिक संस्था करातून (एलबीटी) वगळण्यात यावे, अशी मागणी अहमदनगर स्टेशनरी र्मचंटस् संघटनेने महापौर शीला शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जकात सुरू असताना सर्व प्रकारच्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लागणार्‍या वह्या, पाठय़पुस्तके, विकासमाला, स्लेट व फायबर पाट्या यांना जकातीतून सूट देण्यात आली होती. एलबीटीबाबत व्यापार्‍यांना माहिती देण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत प्रशासनानेही ज्या वस्तूंना जकातीत सूट देण्यात आली होती, त्या वस्तूंना एलबीटीतूनही वगळण्यात येईल, असे सांगितले होते.

मात्र, एलबीटीच्या दरसूचीमध्ये वह्या व नोटबुकवर 3 टक्के दर आकारण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे शहरातील स्टेशनरी व्यापार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जकातीतून ज्या शालेय साहित्यास सूट देण्यात आली होती, ती एलबीटीमध्येही देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.