आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्थानिक स्वराज्य संस्था कराबाबत (एलबीटी) असलेले प्रश्न सोडवण्यासाठी व्यापार्‍यांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत शनिवारी (18 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता नियोजन भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शासनाकडून मिळालेल्या दरसूचीबाबत व्यापारी वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. काही वस्तूंचे दर जकातीपेक्षा जास्त असल्याने व्यापार्‍यांनी एलबीटी भरायला विरोध केला आहे. या प्रश्नी समन्वयातून तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती व्यापारी वर्गाने पालकमंत्र्यांकडे केली होती. व्यापार्‍यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न मनपाने केला, पण तो अयशस्वी ठरला आहे.