आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीचा तिढा सोडण्यास अपयश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका हद्दीत लागू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) दरसूचीबाबत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. तोडगा काढण्यासाठी महापौर शीला शिंदे व आमदार अनिल राठोड यांच्यानंतर आता पालकमंत्री बबनराव पाचपुते प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शनिवारी (18 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन भवनात बैठक होत आहे.

शासनाने मंजूर केलेल्या एलबीटी दरसूचीत काही वस्तुंचे दर जकातीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांनी दरसूचीवर आक्षेप घेऊन एलबीटी न भरण्याचा पवित्रा घेतला. महापौर शिंदे यांनी आमदार राठोड यांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात बैठक घेऊन व्यापार्‍यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. आठवडाभरात सुधारणा करून नवी दरसूची शासनाकडून मंजूर करून आणू, असे आश्वासन राठोड यांनी दिले होते. दरम्यान, एलबीटीचे दर ठरवण्याचा अधिकार महापालिकेलाच आहे, असे नगर दौर्‍यावर आलेले नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे व्यापारी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात काही व्यापार्‍यांनी पालकमंत्री पाचपुते यांना निवेदन देऊन दरसूचीबाबत सर्वमान्य तोडगा काढण्याची मागणी केली. त्यामुळे पाचपुते यांनी या प्रश्नात लक्ष घालून बैठकीचे आयोजन केले आहे.