आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड हजार एलबीटीधारक बनले "अभय'चे लाभार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एलबीटीविवरणपत्र भरणाऱ्या व्यावसायिकांना शासनाच्या अभय योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील सुमारे दीड हजार एलबीटीधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. शासनाने या योजनेस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उर्वरित पाच दिवसांत जास्तीत जास्त व्यावसायिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
शासनाने ५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना एलबीटीतून सूट दिली असून ऑगस्टपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नगर शहरातील तब्बल हजार ५४० व्यावसायिकांची एलबीटीतून सुटका झाली आहे. ज्यांनी आतापर्यंत एलबीटी भरलाच नाही अथवा उशिरा भरला, विवरणपत्र भरले नाही, अशा व्यावसायिकांना दंड व्याजात सूट मिळावी, यासाठी शासनाने अभय योजना सुरू केली. सुरूवातीला ३१ जुलैपर्यंत योजनेची मुदत होती. नंतर योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. शहरातून सुरुवातीला योजनेस प्रतिसाद मिळाला नाही. मनपा प्रशासनाने योजनेची माहिती देण्यासाठी एलबीटीधारकांची कार्यशाळा घेतली, परंतु एलबीटीधारकांनी तिकडे पाठ फिरवली. योजनेचा लाभ घेतल्यास दंड व्याजासह एलबीटी वसूल करण्याचा इशारा उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दिल्यानंतर या योजनेस काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

आतापर्यंत सुमारे दीड हजार एलबीटीधारकांनी अभय योजनेचा लाभ घेतला आहे. उर्वरित एलबीटीधारकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदत आहे. जास्तीत जास्त एलबीटीधारकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. जे एलबीटीधारक १५ ऑगस्ट अखेर योजनेचा लाभ घेणार नाही, त्यांच्याकडून दंड व्याजासह एलबीटी वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत एलबीटीधारकांचे धाबे दणाणले आहे. जुलै महिन्याचा एलबीटीदेखील त्यांना भरावा लागणार आहे. त्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यानंतर मात्र या एलबीटीधारकांना कारवाईस सामोरे जावे लागेल.

मनपाच्या एलबीटीधारकांनी अनेकांना नाेटिसा बजावल्या आहेत. त्यावर उपायुक्त चारठाणकर यांनी सुनावणीदेखील घेतली आहे. उर्वरित एलबीटीधारकांनाही लवकरच नाेटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर दंड व्याजासह एलबीटी वसूल करण्यात येईल.

दहा हजारांपर्यंत दंड
शासनानेअभय योजनेचा लाभ देऊनही एलबीटी विवरणपत्र भरणाऱ्या एलबीटीधारकांकडून दंड व्याजासह एलबीटी वसूल करण्यात येणार आहे. एलबीटी विवरणपत्र भरणाऱ्यांना पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. शिवाय आतापर्यंत एलबीटी भरणाऱ्यांकडून दाेन टक्के व्याजही वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित मुदतीत अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

नगर शहरात आता केवळ सातच एलबीटीधारक
पन्नासकोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेले शहरात सातच व्यावसायिक आहेत. त्यात तीन पेट्रोल कंपन्या, कापड, सिमेंट सराफ व्यावसायिकांचा समावेश आहे. मनपाला यापुढे केवळ या सातच व्यावसायिकांकडून एलबीटी मिळणार आहे. मनपाला एलबीटीपोटी शासनाकडून दरमहा कोटी ३८ लाखांचे अनुदान मिळणार आहे. त्यावरच आता मनपाचा आर्थिक गाडा चालवावा लागेल.