आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे यांनी दत्तक घेतली 208 शेतकरी कुटुंबे, मंत्र्यांना प्रायश्चित्त घेण्‍याचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील कुटुंबाच्या जनसेवा फाउंडेशनने अहमदनगर जिल्ह्यातील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे दत्तक घेतली. मागील सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उपाययोजना केल्या नाहीत. तेव्हाच्या सरकारने शेतकऱ्यांना गांभीर्याने घेतले नाही, तर आताच्या सरकारने वाऱ्यावर सोडलेे. त्यामुळे आधीच्या सरकारमधील मंत्र्यांनी अशी कुटुंबे दत्तक घेऊन प्रायश्चित्त घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. दत्तक कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह, आरोग्य सुविधा आदी सुविधा मिळतील.

सरकारचे लक्ष केवळ स्मार्ट सिटीकडेच
आधीच्या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाहीत. आताच्या सरकारनेदेखील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. केवळ स्मार्ट सिटीकडेच या सरकारचे लक्ष आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकरी प्रश्नांवर गंभीर नाही.
- राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस नेते
बातम्या आणखी आहेत...