आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"यातनांतून सुटकेचा इच्छामरण पर्याय'- सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वैद्यकीय उपचारांना दाद न देणाऱ्या, परंतु हृदय सुरू आहे असे म्हणून जिवंत असलेल्या मरणावस्थेतील व्यक्तींच्या यातना व दु:ख स्वत:ला व त्या व्यक्तीला जाणवते. त्यातून दोघांची सुटका होण्यासाठी इच्छामरण गरजेचे असते, असे मत पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.

पी. एम. मुनोत ट्रस्ट व पी. एम. शहा फाउंडेशन आयोजित "डॉक्टर तुमच्या भेटीला' या उपक्रमांतर्गत विद्या बाळ यांचे व्याख्यान झाले. त्या म्हणाल्या, स्वत:च्या इच्छेनुसार मन व शरीराचा वापर करून कुणाच्या आधाराशिवाय आनंदाने व गुणवत्तापूर्वक सन्मानाने जगण्याची सर्वांची इच्छा असते. आयुष्यात समाधानाची भावना असलेल्यांना इच्छामरण हवे असेल, तर याचा विचार समाजाने केला पाहिजे.
इच्छामरण अथवा वैद्यकीय इच्छापत्र हा सक्तीचा नसून तो स्वत:च्या वैयक्तिक व सद्विवेकबुद्धी जागृत असताना घेण्याचा िनर्णय असल्याचे विद्या बाळ यांनी सांिगतले. प्रास्ताविक शरद मुनोत यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय चेतन गांधी यांनी करून िदला. िप्रयंका आदेश चंगेडिया यांनी मानले.