आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या क्षणी बदलले चित्र : विधान परिषदेसाठी रंगणार तिरंगी लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शेवटच्या अर्ध्या तासात नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अपक्ष उमेदवार जयंत ससाणे हे अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी माघार घेण्यासाठी अर्जावर स्वाक्षरीही केली. मात्र, शेवटच्या क्षणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा फोन आल्याने त्यांनी स्वाक्षरी केलेला अर्ज खिशात घातला. त्यामुळे या निवडणुकीचेे चित्रच बदलून गेले. दरम्यान, ससाणे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. या निवडणुकीसाठी आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी काँगेस-राष्ट्रवादीत आघाडी जागावाटप निश्चित झाले होते. मात्र, तरीदेखील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे जवळचे मानले जाणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण जगताप यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. ससाणे शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा होती, ती काहीअंशी खरी होणार असे वाटत होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या अर्धा तासांत नाट्यमय घडामोडी घडल्या. दुपारी २.४० वाजता जयंत ससाणे, विनायक देशमुख जिल्हाधिकारी कार्यालयात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, उबेद शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ससाणे आल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी अर्जावर स्वाक्षरी देखील केली. मात्र, त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना फोन आल्याने ससाणे यांनी तो अर्ज खिशात घातला. या निवडणुकीत दाखल झालेल्या आठ अर्जांपैकी अपक्ष उमेदवार संजय फंड, भरत नाहाटा, दत्तात्रेय पानसरे साेमनाथ तनपुरे यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण जगताप, शिवसेनेचे उमेदवार शशिकांत गाडे, अपक्ष उमेदवार जयंत ससाणे मच्छिंद्र सुपेकर राहिले आहेत. या निवडणुकीत जगताप, गाडे ससाणे यांच्यात तिरंगी लढत होणार अाहे. ससाणेंच्या अर्जामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे.

एकीकडे अर्ज मागे घेण्याचा दबाव, तर दुसरीकडे समर्थकांचा उमेदवारी ठेवण्याचा आग्रह. छाया: सिद्धार्थ दीक्षित.

जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी जयंत ससाणे आले असता काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्यात मग्न होते.

कर्डिलेंची भूमिका पक्षाची की...?
निवडणुकीत आमदार अरुण जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याने त्यांचे व्याही असणारे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या भूमिकेबाबत तर्क- वितर्क लढवले जात आहेत. कर्डिले युती म्हणून पक्षाचे काम करणार की जगतापांना पाठबळ देणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. गाडे जगताप हे दोघे कर्डिलेंचे व्याही असले, तरी जगताप सख्खे, तर गाडे चुलत व्याही आहेत. कर्डिलेंचा कल कायम जगतापांच्या बाजूने राहिला आहे. गेल्या निवडणुकीत जगतापांच्या विजयात कर्डिलंंचा मोठा वाटा होता. आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

पूर्ण ताकदीने उभे राहणार
मुंबईतकाँग्रेस-राष्ट्रवादीपदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्याने आपण उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. या निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत. समोरचे उमेदवार आपले २५ वर्षांपासून मित्र आहेत. अर्ज मागे घ्यायचा की नाही, याबाबत आपला प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी संपर्क सुरू होता. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत.'' जयंत ससाणे, उमेदवार.
बातम्या आणखी आहेत...