आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेचे चित्र आज होणार स्पष्ट, वाढली मित्रपक्षाची डोकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शनिवार (१२ डिसेंबर) ही अंतिम मुदत असून, ससाणे अर्ज मागे घेणार की निवडणूक लढवणार हे समजणार आहे. ससाणे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर दबाब आणला जात आहे.
राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार अरुण जगताप शिवसेनेकडून शशिकांत गाडे उभे आहेत. जगताप विरुध्द गाडे यांच्यात लढत होणार असली, तरी ससाणे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीच्या जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे. अपक्ष उमेदवारांची संख्याही मोठी आहे. दत्तात्रेय पानसरे,भरतकुमार नाहटा, मच्छिंद्र सुपेकर, सोमनाथ तनपुरे संजय फंड हे पाचजणही रिंगणात आहेत. ससाणे शेवटच्या क्षणी काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ससाणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास काय करायचे याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून अाखली जात आहे. राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांशी बोलणी सुरू आहे. हा तिढा सोडण्यासाठी शुक्रवारी मुंबईत बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, ती रद्द झाली. शनिवारी (१२ डिसेंबर) बैठक होणार आहे.

सकारात्मक तोडगा निघेल...
ससाणेयांचाअर्ज मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते एकत्र बैठक घेणार आहेत. सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न यावेळी केला जाईल. केवळ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा किंवा ठेवण्याचा हा विषय नाही. दोन्ही पक्ष चर्चा करून ताेडगा काढतील.'' माणिकराव ठाकरे, माजीप्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.
बातम्या आणखी आहेत...