आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Legislature Council Election : 427 Voters Cast Their Votes

विधान परिषद निवडणूक : ४२७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील ४२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असले, तरी त्यात ३८ मतदार हे स्वीकृत सदस्य आहेत. स्वीकृत सदस्यांच्या मतदानाबाबत अद्यापि निर्णय झालेला नाही. येत्या डिसेंबरला यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. स्वीकृत सदस्यांचे लक्ष आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे. या निर्णयानंतरच या ३८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार असून, ३० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, तसेच श्रीगोंदे, पाथर्डी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, संगमनेर देवळाली प्रवरा या नगरपरिषदांचे सदस्य मतदार असणार आहेत. शिर्डी, अकोले, कर्जत, पारनेर, नगर पंचायतीचे सदस्यही या निवडणुकीत मतदार असणार आहेत. ४२७ पैकी ३८ मतदार हे स्वीकृत सदस्य आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य ३८९ आहेत. सर्वाधिक ८९ सदस्य जिल्हा परिषदेतील असून, त्यात ७५ सदस्य जि. प. पं. स. सभापती आहेत, तर १४ सदस्य स्वीकृत आहेत. त्याखालोखाल ७१ सदस्य हे नगर महानगरपालिकेचे असून, त्यात सदस्य स्वीकृत आहे. भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाचे सात सदस्य असून, त्यातही एकही स्वीकृत नाही. संगमनेरचे एकूण ३० सदस्य असून, त्यात २७ नगरपरिषदेचे, तर स्वीकृत सदस्य आहेत. कोपरगावचे २९ सदस्य असून, त्यात २६ सदस्य नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य आहेत. राहाता, नगर परिषदेचे १९ सदस्य असून, त्यात स्वीकृत, तर १७ नगरपरिषदेचे सदस्य आहेत. श्रीरामपूरचे ३२ सदस्य अाहेत.त्यात स्वीकृत कर २९ नगरपरिषदेचे सदस्य आहेत. राहुरीचे २० सदस्य असून, त्यात एकही सदस्य स्वीकृत नाही. देवळाली प्रवराचे २० सदस्य असून, स्वीकृत तर १८ नगरपरिषदेचे सदस्य आहेत. पाथर्डीचे १९ सदस्य स्वीकृत, तर १७ नगरपरिषदेचे सदस्य आहेत. श्रीगोंद्याचे २१ सदस्य असून, स्वीकृत तर १९ नगरपरिषदेचे सदस्य आहेत. शिर्डीवगळता अकोले, कर्जत पारनेर या तिन्ही नगर पंचायतींमध्ये एकही स्वीकृत सदस्य नाही. शिर्डीत १९ सदस्य असून, त्यात स्वीकृत, तर १७ नगर पंचायतीचे सदस्य आहेत. अकोले नगर पंचायतीत १७, कर्जत १७ पारनेर १७ सदस्य आहे. ३८ सदस्य हे स्वीकृत सदस्य आहेत, तर ३८९ मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आहेत.

स्वीकृतबाबतला निर्णय
विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वीकृत सदस्यांच्या मतदानाबाबत निवडणूक आयोगाशी यापूर्वीच चर्चा झाली आहे. याबाबत अजून निर्णय झालेला नाही. येत्या डिसेंबरला स्वीकृत सदस्यांच्या मतदानाबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. अनिल कवडे, जिल्हा निवडणूक अधिकारी.