आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यात वनकर्मचारी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाडळी आळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाज सोडून वर काढण्यात आले. - Divya Marathi
पाडळी आळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाज सोडून वर काढण्यात आले.
पारनेर- पाडळी आळे येथील थोरात वस्तीजवळील पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून विहिरीत खाट सोडून वर काढण्याचा तीनदा प्रयत्न केला. चौथ्या प्रयत्नांत बिबट्या वर आला, पण पिंजरा पाहून त्याने धूम ठोकत तेथे उभ्या असलेल्या वन कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला.

अळकुटीजवळील पाडळी आळे परिसरातील भाऊसाहेब थोरात यांच्या घराजवळील विहिरीत पहाटे चारच्या सुमारास बकऱ्याची शिकार करून चाललेला बिबट्या पडला. सकाळी थोरात यांचा मुलगा बकऱ्या सोडण्यासाठी गेला असता त्याला विहिरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला.

वनमंडल अधिकारी एस. एस. साळवे, वनपाल के. आर. बोरसे, एस. एस. चव्हाण, वन कमर्चारी बाबाजी सालके, आर. जी. वाघमारे, नजीर शेख यांनी विहिरीच्या कडेला काटेरी कुंपण केले. त्यानंतर जाळी लावून पिंजरा लावण्यात आला. चौथ्या वेळी बिबट्या बाहेर आला. मात्र, बिथरलेल्या बिबट्याने वन विभागाचे कर्मचारी एस. एस. चव्हाण यांच्या अंगावर उडी मारून त्यांच्या उजव्या हाताला चावा घेऊन पळ काढला. मात्र, पळालेला बिबट्या पुन्हा विहिरीत पडला. त्याला काढण्यासाठी पुन्हा पिंजरा लावला गेला. सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता बिबट्याला वर काढण्यात आले. दरम्यान, जखमी वन कर्मचारी चव्हाण यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.