आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धेच्या घरात रात्रभर होता बिबट्या, 18 तासांनंतर जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हार - राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्दमध्ये भरवस्तीत घरामध्ये घुसलेल्या बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी १८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शुक्रवारी दुपारी वाजता पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले. त्यानंतर परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. 
 
पुजारी गल्लीत गुरुवारी रात्री वाजता बिबट्या आला. परिगाबाई खर्डे ही वृध्दा घरात वीज नसल्याने बाहेर ओट्यावर जेवण करत असताना बिबट्याने घरात प्रवेश केला. घरात गेल्यावर परिगाबाईंना बिबट्या दिसला. त्यांनी पटकन बाहेर येत दरवाजा लावून घेतला. सुदैवाने परिगाबाईंचा मुलगाही घरात नव्हता. तो बाहेर गेला होता. बिबट्या घरात शिरल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. वन विभागाला कळवल्यावर त्यांचे कर्मचारी गायकवाड, शेख दोन पोलिसांनी धाव घेतली. पिंजरा लावण्यात आला, परंतु रात्रभर थांबूनही बिबट्या पिंजऱ्यात आला नाही. 
 
सकाळी वनविभागाचे नाशिक, जुन्नर नगर येथील पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आगलावे, कर्मचारी शेख, खेमनर उपस्थित होते. बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याचे पाहून वन अधिकाऱ्यांनी घरावरील पत्रा कापून छिद्र तयार केले. त्यामधून बांबूच्या साहाय्याने बिबट्यास चुचकारले. काही वेळाने यश येऊन बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याच्या दहशतीत असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी १८ तासांनंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. 
 
वन अधिकारी आगलावे म्हणाले, हा बिबट्या साडेतीन ते चार वर्षांचा असून डिग्रस येथील रोपवाटिकेत नेऊन त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातील. 
 
बातम्या आणखी आहेत...