आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता ओलंडणारा बिबट्या दुचाकीच्या धडकेने ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - मोटारसायकलला धडकल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नगर जिल्ह्यातील लोणी-बाभळेश्वर रस्त्यावर ही घटना घडली. भेदरलेल्या अवस्थेत रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याचे डोके धावत्या मोटारसायकलचे पुढचे चाक इंजिनमध्ये अडकले आणि काही फूट फरपटत गेलेला बिबट्या गतप्राण झाला. मोटारसायकलस्वाराचा अद्याप तपास लागलेला नाही.

मोटारसायकलस्वार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान लोणी-बाभळेश्वर रस्त्यावरून जात होता. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उसाच्या शेतात असलेला बिबट्या अचानक रस्त्यावर आला आणि त्या अज्ञात मोटारसायकलमध्ये विचित्र प्रकारे अडकला. मोटारसायकलचे पुढचे चाक इंजिन यामध्ये त्या बिबट्याचे डोके मान अडकल्याने तो काही फूट फरपटत गेला. तर, मोटारसायकलस्वार बाजूला फेकला गेल्याने किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ही बातमी लोणी परिसरात वेगाने पसरली बघ्यांची घटनास्थळी एकच गर्दी झाली. मात्र, या प्रकाराने घाबरलेल्या मोटारसायकलस्वाराने तेथून धूम ठोकली.
मोटरसायकलच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.