आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Let\'s Completing Vote,then Become Chief Minister ;cm Critise Ajit Pawar

मतदान होऊ द्या, नंतर मुख्यमंत्री व्हा ; अशोक चव्‍हाणांचा अजित पवारांना टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - राज्यात आघाडीचे सरकार आहे. आघाडीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. मुख्यमंत्री कुणी व्हायचे यासाठी आधी मतदान तर होऊ द्या, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. साईंचे सपत्नीक दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यात काँग्रेस पक्ष आणि सरकार दोघांचेही काम चांगले आहे. मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असून, सर्व पक्षांनी एकत्र येऊन तालुकास्तरावर काम करण्याची गरज आहे. दुष्काळाचे राजकारण करू नये. निधीअभावी मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यात आली होती; परंतु प्रकल्पांची कामे जास्त प्रमाणात सुरू केल्याने निधी कमी पडला आणि अनेक सिंचन प्रकल्प रखडले.
साई समाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर निधी मिळावा म्हणून या जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी प्रयत्न करावेत. आपण आवश्यक तेथे मदत करू, अशी ग्वाहीदेखील अशोक चव्हाण यांनी दिली.