आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Letter Colony, Adarsh Nagar Affected Flood Issue

विद्या कॉलनी, अादर्शनगर जलमय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नगर-कल्याण महामार्गावरील विद्या कॉलनी, आदर्शनगर पाण्याने वेढले गेले अाहे. एखाद्या बेटासारखी स्थिती तेथे निर्माण झाली आहे. घरांभोवती पाणी साचल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यांनाही तळ्याचे स्वरूप आल्याने नागरिकांना पायी चालण्यासाठीही कसरत करावी लागत आहे.
ओढे बुजवून केलेली अितक्रमणे, गटारांचा अभाव आणि धाब्यावर बसवलेल्या नगररचनाच्या नियमांमुळे हे संकट दरवर्षी उद्भवते. महापािलका प्रशासन व स्थािनक नगरसेवक या परिसराकडे फिरकतही नाही. नवीन प्रभाग रचनेनुसार हा परिसर हद्दीच्या वादात सापडला आहे. त्यामुळे येथील नागरी सुिवधांचा बोजवारा उडाला असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. छाया : कल्पक हतवळणे