आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lieutenant General Philip Composed Sper\ak About War

मोठ्या कारवायांसाठी सज्ज रहा, लेफ्टनंट जनरल फिलिप कंपोज यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लष्करी अधिकाऱ्यांनी मोठ्या कारवायांसाठी सतत सज्ज राहावे, असे भारतीय लष्कराचे उपसेनापती, तसेच मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे (एमआयआरसी) कर्नल ऑफ रेिजमेंट लेफ्टनंट जनरल फिलिप कंपोज यांनी सांगितले.
नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) येथे सहा व सात नोव्हेंबरला लष्करी अधिकाऱ्यांची द्विवार्षिक परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट जनरल कंपोज यांनी लष्करी सज्जतेचा आढावा घेऊन त्यांना सूचना केल्या. यावेळी लष्कराचे देशभरातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सैन्याची क्षमता व प्रशिक्षणातील सुधारणेसाठी सतत सज्ज राहावे, असे लेफ्टनंट जनरल कंपोज म्हणाले. या परिषदेत लष्कराच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.
या परिषदेनिमित्त आंतर बटालियन चॅम्पियनशीप मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात १९२ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर ‘अमेझिंग ड्रील’चा कार्यक्रम झाला. त्यात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने संचलन सादर करण्यात आले. सैनिकांचा ताळमेळ हे त्याचे वैशिष्ट्य होते. दुसऱ्या दिवशी सैनिकांचे संमेलन झाले. कर्तव्य बजावण्यासाठी समर्पण भावनेने काम करण्याचे आवाहन यावेळी त्यांना करण्यात आले.